ब्रेकींग : आठ तासाच्या चौकशीनंतर नवाब मलीक यांना ईडीकडून अटक

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) यांना अटक करण्यात आली आहे. आज सकाळी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

 

अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरावर आज पहाटे सक्तवसुली संचलनालयाने छापे टाकले आहेत. सध्या मलिक यांना ईडीने ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केली. आठ तासाच्या चौकशीनंतर ईडीने नवाब मलीक यांना अटक केली आहे.

याआधी अंडरवर्ल्डशी संबंधित इक्बाल कासकर तसेच अन्य काही व्यक्तींची चौकशी करण्यात आली होती. त्यांच्या खात्यात काही आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती ईडीकडे असल्याचं समोर आलं आहे. १९९३ च्या बॉंम्बस्फोटातील एका आरोपीची जमीन मलिकांनी विकत घेतली होती. यासंदर्भात ईडीकडून कसून चौकशी केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना घेऊन ईडीचे अधिकारी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात घेवून गेले आहे. असून जेजे रुग्णालयात मेडिकल करण्यात येईल. त्यानंतर त्यांना न्यायालयात नेण्यात येईल. गुन्हेगारांकडून जमीन खरेदी केल्याचा ठपका नवाब मलिक यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Protected Content