रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील ऐनपूर येथे रविवारी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. बारागाड्या ओढतांना बैलगाडीचा जुंपणाचा फटका बसल्याने एकाचा दुदैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दिनकर रामकृष्ण जैतकर रा. ऐनपूर ता.रावेर असे मृत्यू झालेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर येथील बारागाड्याचा अनर्थ टळल्यानंतर आज रविवारी रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे बारागाड्या ओढतांना दुदैवी घटना घडली. ऐनुपर येथे मरीमाता यात्रोत्सवानिमित्त ओढण्यात येणाऱ्या बारागाड्या दिनकर रामकृष्ण जैतकर याला गाड्या दिशाहीन होऊन पहील्या गाडीचे जुपन डोक्याला लागल्याने गंभीर दुखापत झाली. यात त्यांचा दुदैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच बघणा-यांची एकच गर्दी जमा झाली होती रावेर तालुक्यात आज आहीरवाडी, रसलपुर या ठिकाणी देखिल बारागाड्या ओढण्यात आल्या.