ब्राम्हणशेवगे येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

ब्राम्हणशेवगे ता.चाळीसगाव -लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । नाईकनगर येथील विठ्ठल- रुखमाई मंदिर परिसरात दि.१२ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

 

नाईक नगर येथील विठ्ठल रुक्माई मंदिराचे कळस रोहन श्री संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज प्राणप्रतिष्ठा, श्री संत सेवालाल महाराज मंदिराचे कलश रोहण व प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम या कालावधीत संपन्न झाला. दि. १२ रोजी सकाळी ९ ते११ मूर्ति मिरवणूक जलाधिवास व इतर पूजन, सांप्रदायी भजन भजनी मंडळी नाईकनगर ब्राम्हणशेवगे व ह.भ.प.अशोक महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दि. १३ रोजी मूर्तीपूजन पंचग व्याकरण, अग्नी स्थापना इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन ह.भ.प.गणेशजी महाराज व भजनी मंडळी सावरगाव यांचे माध्यमातून संपन्न झाला. तसेच दि. १४ रोजी स्थापित देवता हवन, मूर्ती प्रतिष्ठापना, कलश रोहण, ध्वज रोहण, बलिदान, पूर्ण आहूती, महाआरती आदी कार्यक्रमाचे ह.भ.प.भागवताचार्य संजयजी महाराज ओढरेकर यांचे कीर्तनाच्या माध्यमातून संपन्न झाला. तसेच दि. १५ रोजी संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे मिरवणुकीचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलश रोहण श्री शिवभक्त प्रकाश नंदगिरीजी स्वामी गंगाआश्रम यांच्या हस्ते संपन्न झाला. विठ्ठल रुखमाई मंदिराचे पुजारी ह.भ.प.वसंत भानुदास राठोड व ब्राम्हणशेवगे, नाईकनगर भजनी मंडळी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे आयोजन नाईक नगर येथील नोकरदार वर्ग नवतरुण मित्र मंडळ यांनी केले होते. याप्रसंगी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content