ब्रँडेड मद्य विक्रीला जेनेरिक मद्य हा उपाय का नाही ? : डॉ. नितु पाटील (‘पटत का बघा ?’ भाग ४)

भुसावळ, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली ब्रँडेड मद्य विक्रीस शासनाने आता परवानगी दिली आहे. ज्या प्रमाणे शासनाने ब्रँडेड औषधींसोबत जेनेरिक औषधे विक्रीस परवानगी दिली आहे त्याच धर्तीवर ब्रँडेड मद्य विक्रीला जेनेरिक मद्य हा उपाय का नाही असा सवाल डॉ. नितु पाटील यांनी आपल्या ‘पटत का बघा ?’ या सदरातून उपस्थित केला आहे.

औषधी तयार करण्याऱ्या कंपनी जास्त नफा कमावतात …… जेनेरिक औषधी घ्या
औषधी कंपनी जाहिरातवर जास्त खर्च करतात…… जेनेरिक औषधी घ्या
घायुक व्यापारी जास्त नफा कमवतात ……. जेनेरिक औषधी घ्या
डॉक्टर आणि औषधी कंपनी साटेलोटे आहे…. जेनेरिक औषधी घ्या
ब्रँडेड औषधी जास्त किमतीच्या विकल्या जातात…… जेनेरिक औषधी घ्या

जर सर्व काही जेनेरिक आहे,शिवाय उत्तम गुणवत्ता तेही कमी किमतीत तर अजून काय पाहिजे,शिवाय आरोग्य उत्तम आणि पैसाची मोठी बचत ……तर मग

“ ब्रँडेड मद्याविक्रीला जेनेरिक मद्य हा उपाय का नाही ….जेनेरिक मद्य ”

फायदे:-
१. कमी किमतीत चांगल्या प्रतीचे मद्य मिळेल.
२. शासनाने जेनेरिक औषधी प्रमाणे जेनेरिक मद्याचा प्रचार,प्रसार करावा.
३. जनतेची यावर विश्वासाहर्ता वाढेल.
४. शासकीय जेनेरिक मद्य विक्रीची दुकाने सुरु करावीत,त्यामुळे रोजगार वाढेल.
५. शासकीय महसूल वाढेल.
६. समांतर मद्य नावाने जाहिरात करण्याची गरज पडणार नाही, जसे मद्याची जाहिरात सोडाच्या नावाने,वा पाणाच्या नावाने करणे.
शेवटी कमी किमतीत जास्त आरोग्य वर्धक मद्य मिळायला लागल्यावर जनता पण खुश आणि महसूल तो आहेच.

डॉ.नितु पाटील,
०८०५५५९५९९९

Protected Content