यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील बोरावल खुर्द येथील विकासोच्या झालेल्या निवडणूकीत शेतकरी पॅनलने संपूर्ण १३ जागा पटकावत दणदणीत विजय संपादन केला आहे. परस्पर विरोधी विकास पॅनल एकही जागा जिंकू न शकल्याने विकास पॅनलचा या निवडणुकीत धुव्वा उडाला आहे.
बोरावल खुर्द विविध कार्यकारी सोसायटी चे कार्यक्षेत्रात बोरावल खुर्द, बोरावल बुद्रुक, टाकरखेडा, भालशिव, पिंप्री व टेंभी कुरन या पंचक्रोशीतील शेतकरी, सभासद म्हणून असल्याने तालुक्यातील मोठी विकासो संस्था मानल्या जाते. या विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन सतीश पाटील व यावलचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते अतुल वसंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पॅनलने हे यश संपादन केले आहे. विजयी झाल्याने शेतकरी पॅनल कडून गावात जल्लोष करण्यात आला. शेतकरी पॅनलने प्रतिस्पर्धी दयाराम चौधरी यांच्या विकास पॅनल एकही जागा जिंकू शकले नाही.
शेतकरी पॅनलचे विजयी झालेल्या १३ उमेदवारांमध्ये यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी ( २६५),गुरूदास गंगाधर पाटील (२७०),संतोष आनंदा पाटील (२५४), कमलाकर लालचंद सपकाळे (२५१), समाधान रामदास पाटील (२४९ ), यशवंत बाबुराव चौधरी (२३९), भगवान भागवत कोळी (२३८), कुलदिप इश्वर पाटील (२३३), संजय नारायण महाजन ( २३१), अंजनाबाई अमृत पाटील (२४५),शशीकला समाधान चौधरी (२४४), रतन बन्सी कोळी ( २७८) व शरद सुदामदेव चौधरी (२६३) असे सर्व उमेदवार विजयी झाले आहे तर विजयानंतर शेतकरी पॅनलकडून जल्लोष करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम. व्ही. महाजन यांनी काम काज पाहिले या संस्थेचे कार्यक्षेत्र बोरावल खुर्द,बोरावल बुद्रुक, टाकरखेडा,भालशिव, पिंप्री व टेंभी कुरन असे आहे. यावेळी उमेदवारांच्या विजय झाल्याचे जाहीर झाल्यानंतर अतुल पाटील यांनी सर्व मतदारांचे विशेष आभार मानले.