कोणताही नवीन विचार नाही- चिदंबरम

नवी दिल्ली । यंदाच्या अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात गोंधळ स्पष्ट झाला असून यात अर्थव्यवस्थेला गती देण्याचा कोणताही नवीन विचार नसल्याची टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केली आहे.

माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. ते म्हणाले की, अर्थमंत्र्यांया भाषणात मला कोणताही अविस्मरणीय विचार किंवा घोषणाही दिसली नाही. अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याची आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची आशा सरकारने सोडली आहे. अर्थव्यवस्था संकटात आहे हे सरकारने मान्य केलं आहे. मात्र, अर्थव्यवस्था सुधारण्यावर त्यांचा विश्‍वास नाही, असे टीकास्त्र त्यांनी सोडले. जनतेला असा अर्थसंकल्प नको होता. त्यासाठी जनतेने भाजपला मतदान केलं नव्हतं, असेही ते म्हणाले.

Protected Content