घरफोडी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन संशयितांना अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मेहरूण तलाव परिसरात घरफोडी आणि चोरीच्या प्रयत्नात असलेल्या तीन संशयितांना एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. तिघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने तिघांची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील मेहरून तलाव परिसरात वासुदेव महाजन यांच्या बंगल्याच्या समोर असलेल्या गल्लीत अंधाराचा फायदा घेत चोरी आणि घरपोडी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन संशयित आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी १० एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता अटक केली आहे. यात विशाल मुरलीधर दाभाडे रा. आदित्य हॉटेल चौक, रामेश्वर कॉलनी जळगाव, दीपक शांताराम रेणुके रा. गोकुळ नगर, तांबापुरा जळगाव आणि गुरुजीतसिंग सुजानसिंग बावरी रा. तांबापुरा असे अटक केलेल्या तीन संशयित आरोपींची नावे आहेत. या अटकेतील गुरुजीतसिंग बावरी यांच्या विरोधात आत्तापर्यंत वेगवेगळे १० गंभीर गंभीर गुन्हे दाखल आहे तर विशाल दाभाडे याला जिल्हा पोलीसांनी २ वर्षाकरिता हद्दपार करण्यात आलेले होते. तीनही संशयित आरोपींविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यासोबत असलेले घरफोडी करण्याचे साहित्य सुरा व स्क्रू ड्रायव्हर या वस्तू हस्तगत करण्यात आले आहे. ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी, पोलीस नाईक इम्रान सय्यद, मंदार पाटील, चेतन सोनवणे, सचिन पाटील, साईनाथ मुंडे, संदीप धनगर यांनी केली आहे. तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती जे. एस. केळकर यांनी तिघांची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले.

Protected Content