बोदवड, प्रतिनिधी | दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त बोदवड येथे शिवसेनेच्या वतीने पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. यात दैनिक लोकमतचे गोपाल व्यास, दैनिक सकाळ अमोल आमोदकर, दैनिक देशोन्नती अर्जुन असणे, दैनिक जळगाव वृत्त गोपीचंद सुरवाडे, दैनिक दिव्य मराठी संदीप बैरागी, व लाईव्ह ट्रेंड्स न्युजचे सुरेश कोळी आदींचा समाविष्ट आहेत.
याप्रसंगी सचिन राजपूत, सुनील बोरसे नगरसेवक शिवसेना कार्यकर्ते शांताराम कोळी, गोपाल पाटील, शिवसेना विभाग प्रमुख गजानन बोंडेकर, सचिन पाटील, मनोज पाटील , रुपेश आदी उपस्थित होते.