बोदवड प्रतिनिधी । शहरातील गांधी चौकात एका दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ५० हजार रूपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, प्रभाकर पुंजाजी बावस्कर (वय-६४) रा. लोणवडी ता. बोदवड हे सेवानिवृत्त शाळेचे शिपाई आहेत. बोदवड शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया येथे कामाच्या निमित्ताने ते दुचाकीने २५ ऑगस्ट रोजी आले. दरम्यान गांधी चौकात असलेले समाधान कचोरी नाष्टाच्या हातगाडी दुकानासमोर उभे असतांना अज्ञात चोरट्याने त्यांच्या डिक्कीत ठेवलेले ५० हजार रूपयांची रोकड चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गजानन काळे करीत आहे.