Home क्राईम बोदवड येथे ऑनलाइन सर्व्हिस सेंटरमध्ये चोरी

बोदवड येथे ऑनलाइन सर्व्हिस सेंटरमध्ये चोरी

0
105
WhatsApp Image 2019 07 08 at 9.40.06 PM
WhatsApp Image 2019 07 08 at 9.40.06 PM

WhatsApp Image 2019 07 08 at 9.40.06 PM

बोदवड (प्रतिनिधी): येथे गांधी चौक रघुवीर व्यायाम शाळेसमोरील ओम ऑनलाईन सेंटर दुकानाच्या  शटरचे कुलुप तोडून अज्ञात चौरट्यानी १५०० रुपयांची रोकड तर १४ हजार ५०० रूपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत अज्ञात चोरट्या विरोधात बोदवड पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

किरण शालीग्राम राऊत (वय ४२ रा. आनंद नगर) यांचे ऑनलाईन सर्व्हिस सेंटर आहे. त्यांच्या ऑनलाईन सेंटरच्या दुकानाच्या शेटरचे कुलुप तोडून कॉम्प्युटर बॅटरी ७ हजार रूपये , इन्व्हर्टर ६ हजार रूपये , रोकड १५,०० रुपये व दहा विसच्या नोटा व चील्लर असा एकुण १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चौरट्यानी चोरून नेला आहे. पुढील तपास कालीचरण बिऱ्हाडे हे करीत आहेत.


Protected Content

Play sound