बेंडाळे महिला महाविद्यालयात युवक सप्ताहनिमित्त रांगोळी स्पर्धा

जळगाव प्रतिनिधी । बेंडाळे महिला महाविद्यालयात युवक सप्ताहनिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय कलामंचतर्फे रांगोळी स्पर्धा आज २१ जानेवारी रोजी दुपारी घेण्यात आल्या. आयोजित स्पर्धांचे उद्घाटन उपप्राचार्य व्ही.जे.पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी अभाविपचे महानगरमंत्री आदेश पाटील, राष्ट्रीय कलामंच प्रमुख भूमिका कानडे, अभाविपचे हेमानी वाडीकर, हेमांगी पाटील,प्रज्ञा करंजे, रितेश महाजन, पवन भोई, चिराग तायडे, नितेश चौधरी, जितेश चौधरी, ऋतीक माहुरकर, प्रसाद पाटील, विजय वानखेडे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रम प्रमुख भुमिका कानडे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना राष्ट्रिय कलामंच मार्फत घेण्यात येणारे विविध उपक्रम ,स्पर्धा आयोजित केल्या जातात, राष्ट्रिय पातळीवर युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी व त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कलाक्षेत्रात वाव देण्यासाठी राष्ट्रीय कलामंच कार्यरत असते असे सांगितले. तसेच महानगरमंत्री आदेश पाटील यांनी अभाविप मांडणी करतांना अभाविप मार्फत घेण्यात आलेल्या मिशन साहसी या कार्यक्रमाची माहिती सांगत मिशन साहसी अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील 5 हजार विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे दिले असल्याची माहिती दिली. तर उपप्राचार्य व्ही.जे.पाटील यांनी मनोगतात सांगितले की, अभाविपने कोरोनाच्या काळात केलेल्या कार्याची स्पर्धकांना माहिती दिली. विद्यार्थी परिषद ही देशव्यापी संघटना असून नेहमीच राष्ट्रीय हिताचे कार्य करते व तसेच विद्यार्थ्यांना देशहितासाठी अभाविप मध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हेमांगी पाटील यांनी केले. स्पर्धेसाठी कुमुद नारखेडे यांनी परीक्षण केले.

Protected Content