जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गुजरातमधील बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींना सोडण्यात आले असून आज याचा जळगावात निषेध करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रपती व पंतप्रधान यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिलेल्या निवेदनातून या प्रकरणातील ११ दोषींची झालेली माफी रद्द करा अशी अशी मागणी सर्व पक्षीय, सर्व धर्मीय, सामजिक संघटना, जळगावतर्फे करण्यात करण्यात आली आहे.
गुजरात सरकारने बिल्कीस बानो सामूहिक अत्याचार व खून प्रकरणातील जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेल्या अकरा दोषींना गोधरा उपकारागार येथून सुटका केली आहे त्यांना गुजरात सरकारच्या क्षमा नितीनुसार माफी देण्यात आली आहे. सन २००२ मध्ये बिल्कीस बानो सामूहिक अत्याचार प्रकरणात तिच्यासह तिच्या कुटुंबातील सात सदस्यांची हत्या करण्यात आली होती त्यात दोन वर्षीय बालिकेतही समावेश होता. गुजरात सरकारने ९ जुलै १९९२ रोजी माफी नितीनुसार माफी निती तयार केली आहे. या नितीनुसार कैदी आपल्या सुटकेसाठी अर्ज देऊ शकतो. यात वीस वर्षापेक्षा जास्त वर्षाची जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने एक तृतीयांश शिक्षा भोगली असेल तर तो हा अर्ज करू शकतो. त्याच्या अर्जावर सरकार विचार करून त्याची वागणूक आणि तपास रिपोर्ट नंतर त्याची सुटका करण्यात येते. गुजरात सरकारच्या क्षमा नीती आणि केंद्र सरकारच्या क्षमा नीतीमध्ये स्पष्ट सामुहिक अत्याचार व सामुहिक हत्याकांडातील दोषींना ह्या नीतीनुसार सूट मिळू शकणार नाही असे स्पष्ट म्हटले आहे. असे असताना गुजरात सरकारने दिलेली सूट क्षमा नीतीचे उल्लंघन आहे. याकरिता अकरा आरोपींना आरोपींची सूट रद्द करून त्यांना पुन्हा जेलमध्ये टाकावे अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर . मुफ्ती हारून नदवी, मनियार बिरादरी अध्यक्ष फारुक शेख, ह्यूमन राइट्स अन्वर खान उस्मान खान, कुल जमाती अध्यक्ष सय्यद चांद अमीर, राष्ट्रवादी पार्टी प्रतिभा शिरसाठ महिला सुरक्षा समिती निवेदिता ताठे, मनसे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, कॉंग्रेसचे बाबा देशमुख आदींची स्वाक्षरी आहे.