विद्रोही साहित्य संमेलनाच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  दि ३ व ४ फेब्रुवारी २०२४ ला आयोजीत करण्यात आलेल्या १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन समितीचे संपर्क कार्यालयाचे उद् घाटन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिवसाला करण्यात आले.

अमळनेर येथील धुळे रोड येथे सायंकाळी संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याध्यक्ष अविनाश पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी प्रा.एच.टी.माळी, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी  अशोक बिर्हाडे, प्रा.अशोक पवार, गौतम मोरे,डॉ जि.एम.पाटील, कवी शरद धनगर,कवी डॉ.दिनेश पाटील हे होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी भाषणातून सांगितले की  छ.शिवाजी महाराज,महात्मा फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा घेऊन संविधानिक मूल्यांवर आधारित विचारधारेतून मानवतावादी साहित्याचा जागर करणारे विद्रोही साहित्य संमेलन असेल. विद्रोही संमेलन खानदेशातील स्वातंत्र्य चळवळ, शेतकरी-कष्टकरी महिलांच्या प्रश्न मांडणार्‍या चळवळींसह सानेगुरुजी , बहिणाबाई यांच्या साहित्य चळवळींचा जागर होणार आहे.या साहित्य संमेलनात राजकीय विद्रोह विचार निश्चितपणे पुढे येतील अशी अपेक्षा आहे. प्रास्तविक प्रा.डॉ.लिलाधर पाटील यांनी केले. सुत्रसंचलन अर्बन बँक संचालक रणजित शिंदे यांनी केले.

यावेळी विद्रोही मराठी साहित्य संमेलन समितीच्यावतीने ऑनलाईन काव्य स्पर्धा जाहीर करण्यात आली.सदर स्पर्धा टँब वर बटन क्लिक करून उद् घाटन सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका दर्शना पवार , वैशाली शेवाळे,भारती गाला, प्रज्ञा खैरनार, सौ.रत्ना बिर्‍हाडे यांच्या हस्ते करण्यात आले. नगरसेवक श्याम पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

यावेळी प्रा.डॉ.विलास पाटील,बापूराव ठाकरे, प्रेमराज पवार, डी.ए.पाटील,अशोक पाटील,अजय भामरे , प्रा.विजय वाघमारे, दिपक संदानशिव, महेश पाटील, अजिंक्य चिखलोदकर , चंद्रकांत जगदाळे, प्रा.सुनिल वाघमारे, गौतम सपकाळे,अनिल महाले, प्रा.डॉ.प्रशांत पाटील, सनी गायकवाड, गुणवंतराव पवार, तुषार दत्ता संदांशिव, संजय पाटील, प्रा.सी.आर.पाटील, गोपाळ पाटील,शरद पाटील, जयवंत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content