खडसे महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

मुक्ताईनगर- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जी.जी.खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा विभागाद्वारे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन  कार्यक्रम संपन्न झाला. या अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य  हेमंत महाजन उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी  म्हणून प्रा. डॉ. लव्हाळे मॅडम –  संत मुक्ताई महाविद्यालय, मुक्ताईनगर उपस्थित होत्या.

या अभिवादन कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. अनिल पाटील, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र चौधरी, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. संजीव साळवे व क्रीडा संचालिका डॉ.प्रतिभा ढाके उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या अभिवादन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य महाजन यांनी ‘विद्यार्थ्यांनी गुणवंतासोबत  शीलवंत बनावे’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश दिला. प्रमुख अतिथी प्राध्यापक लव्हाळे मॅडम यांनी ‘महासागराचे पाणी कधी आटणार नाही आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कर्तृत्व  व विचार कधी मिटणार नाहीत’ अशा गौरवास्पद भावना व्यक्त केल्या .या अभिवादन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक विजय डांगे यांनी तर आभार प्रदर्शन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक बावस्कर यांनी केले. या  अभिवादन कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी वर्ग बहुसंख्य उपस्थित होते.

Protected Content