मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्यावरचा टेलिफोन ऑपरेटर कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने थोरात हे होम क्वारंटाईन झाले असल्याचे खळबळजनक वृत्त समोर आले आहे.
राज्यातील महाविकासआघाडीतील राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यासोबत काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झालेली. हे तिन्ही मंत्री कोरोनावर मात करत आपल्या घरी परतले आहेत. तशात आता राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्यावरचा टेलिफोन ऑपरेटर कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने त्यांना होम क्वारंटाईन व्हावे लागले आहे. दरम्यान, थोरात यांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून त्यांचा रिपोर्ट अजून प्रलंबित आहे.