जळगाव शहरासह तालुक्यात वाढला कोरोनाचा संसर्ग; जिल्ह्यात नवीन १६९ पॉझिटीव्ह रूग्ण

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढतच असून आज नवीन १६९ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात विशेष म्हणजे जळगाव शहरासह तालुक्यातील संसर्ग वाढल्याचेही अधोरेखीत झाले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात एकूण १६९ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ७३ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या खालोखाल जळगाव ग्रामीण १६; भुसावळ १३; चोपडा १३ आणि जामनेर-१० असे रूग्ण आढळून आले आहेत.

अन्य ठिकाणांचा विचार केला असता, अमळनेर-९; पाचोरा-४; भडगाव-४; धरणगाव-६; यावल-७; एरंडोल-१; रावेर-८; चाळीसगाव-४; बोदवड-१ अशी रूग्णसंख्या आहे.

दरम्यान, आजच्या बाधितांची संख्या मिळवली असता आजवर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ५४७१ इतका झालेला आहे. यातील ३२२३ रूग्ण बरे झाले आहेत. तर सध्या कोविड केअर सेंटरमध्ये-१४०९; कोविड हॉस्पीटलमध्ये-१०३ तर डेडीकेटेड कोविड हॉस्पीटलमध्ये ४२१ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ६ मृत्यू झाले असून आजवरील मृतांची संख्या ३१५ इतकी असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून जळगाव शहरातील संसर्ग वाढीस लागल्याचे बाधीतांच्या आकडेवारीतून दिसून आले आहे. आज देखील जिल्ह्यातील सर्वाधीक रूग्ण हे जळगाव शहरातीलच आहेत. मात्र आजच्या रिपोर्टची लक्षणीय बाब म्हणजे जळगाव ग्रामीण म्हणजे जळगाव तालुक्यातही संसर्ग वाढल्याचे दिसून आले आहे. शहराच्या खालोखाल जळगाव तालुक्यातील रूग्ण संख्या असल्याची बाब लक्षणीय आहे. यामुळे जळगाव तालुक्यात आता कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे स्पष्ट झाले असून आरोग्य यंत्रणेला याचा प्रतिकार करावा लागणार आहे.

Protected Content