प्रभाग क्रमांक दोन मधील चार्‍या बुजविल्या

जळगाव प्रतिनिधी । शहरातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये आजपासून चार्‍या बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, शिवाजीनगर परिसरात असणार्‍या प्रभाग क्रमांक दोनमध्ये आज एरियानुसार ड्रेनेजचे काम झाल्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर पडलेल्या चार्‍या बुजविण्यात आल्या. प्रभागतील परिसर आर. वाय. पार्क,जुने दालफड, कन्या छत्रालय, दर्गा पासून क्षत्रिय मराठा समाज मंदिर पर्यंत, नागला किराणा ते नवीन दालफड व कंडारे यांच्या घरापर्यंत बुजविण्यात आले. त्या प्रसंगी ड्रेनेजचे ठेकेदार व कर्मचारी व प्रभागचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे उपस्थित होते. यासोबत शिवाजी नगर मधील रेल्वे लाइनच्या भिंतीला लागून मागील वर्षी लावण्यात आलेल्या वृक्षांच्या भोवती वाढलेले तण व कचरा हे महानगरपालिका कर्मचारी यांच्या कडून साफ करण्यात आले.

Protected Content