बालिकेवर अत्याचार करून भावासह विहरीत फेकले

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील धानोरा येथील एका लिंगपिसाट नराधमाने बालिकेवर अत्याचार करून तिला तिच्या भावासह विहरीत फेकल्याची घटना घडली आहे.

याबाबत वृत्तांत असा की, धानोरा येथे गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आरोपी खालिद शेख इस्माईल याने सात वर्षीय बालिका व तिचा सहा वर्षीय भाऊ यांना बोरे खाण्याच्या बहाण्याने शेतात घेऊन गेला. तेथे त्या बालिकेवर अत्याचार केले. यानंतर त्याने तिला व तिच्या भावाला विहिरीत फेकले. विशेष म्हणजे खालिद शेख इस्माईल याने ही बाब पोलिसपाटील दिनेश पाटील यांना सांगितली. दिनेश पाटील यांनी याबाबत पोलिसांना कळवले. दरम्यान, रात्री दहा वाजेच्या सुमारास पट्टीच्या पोहणार्‍यांनी शोध सुरू केला. रात्री परिसरातील १० विहिरी शोधून काढल्या. मात्र, त्यात दोघांचा तपास लागला नाही. त्यामुळे गावकर्‍यांनी दोन्ही भाऊ-बहिणींची शेतशिवारात शोधमोहीम सुरू केली आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता.

Add Comment

Protected Content