जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील फातेमा नगरात राहणाऱ्या दीड वर्षाच्या बालकाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना शिरसोली रस्त्यावर घडली होती. या प्रकरणी सोमवारी १२ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शेख अमीन शेख आरिफ यांना १५ दिवसांपूर्वीच मुलगी झाली होती. त्यामुळे मुलीला पाहण्यासाठी रविवारी ११ डिसेंबर रोजी गेले होते. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जळगाव शिरसोली रस्त्यावरील एचएल पेट्रोल पंपाजवळून जळगावकडे जात असतांना मागून भारधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू छोटा हत्ती क्रमांक (एमएच १९ सीवाय ३२९०) या वाहनाने जोरदार धडक दिली, या धडकेत दुचाकीवरील दीड वर्षाचा चिमुकला शेख अली याचा अपघातात मृत्यू झाला होता. याप्रकरणी शेख शरीफ शेख आरिफ (वय-२५) याने दिलेल्या फिर्यादीवरून सोमवार १२ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सपोनि अमोल मोरे करीत आहे.