Home क्रीडा जळगाव जिल्ह्याचा १४ वर्षा आतील मुलांच्या संघ जाहीर

जळगाव जिल्ह्याचा १४ वर्षा आतील मुलांच्या संघ जाहीर

0
74

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १४ वर्षाखालील आमंत्रित क्रिकेट स्पर्धा दि. १५ डिसेंबर ते २३ डिसेंबर २०२२ यादरम्यान पुणे येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी अंतिम १४ खेळाडूंची निवड करण्यात आली.

 

 

 

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १४ वर्षाखालील आमंत्रित क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम जळगाव जिल्हा प्राथमिक संघाची निवड करण्यात आली. त्यानंतर सराव शिबिर व पाच सराव सामन्यातील कामगिरीच्या आधारे अंतिम १४ खेळाडूंची निवड करण्यात आली. या संघात  अभय वाघमोडे ,  मानस पाटील,  विराज मंधवाणी ,  प्रथम पवार , आर्यन पाटील,  अक्षय मेघानी  पवन दुबे , कृष्णा पि महाजन, वंश पाटील,  शलोक महाजन,  ऋषी जाबाक,  प्रथमेश पाटील ,  सोहम जैन, पियूष पवार यांचा समावेश आहे. या संघाची निवड संजय पवार , डॉ. संतोष बडगुजर, प्रशांत विरकर यांच्या  निवड समितीने केली.  संघ प्रशिक्षक म्हणून मुश्ताक अली संघा सोबत असतील. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे  अध्यक्ष अतुल जैन , उपाध्यक्ष एस. टी. खैरनार, सचिव अरविंद देशपांडे, सहसचिव अविनाश लाठी व मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकुल यांनी  खेळाडुंचे अभिनंदन केले व क्रिकेट स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


Protected Content

Play sound