Home क्राईम दुचाकी लांबवणारे दोघे एलसीबीच्या ताब्यात

दुचाकी लांबवणारे दोघे एलसीबीच्या ताब्यात

0
156


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरातून दुचाकी लांबविणाऱ्या दोन संशयित आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पांडे चौकातून दोघांना अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी दोघांना शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.  विजय उत्तम सुतार (वय- 35 ) आणि चंचल ओमप्रकाश सालवी (वय- 38) दोघे रा. गोलाणी मार्केट, जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नाव आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील गोलाणी मार्केट येथून तरुणाची दुचाकी लांबवल्याची घटना 11 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता घडली होती. याप्रकारे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी पांडे चौकात दुचाकी घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलीस निरीक्षक किसनराव पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने मंगळवारी १३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता पांडे चौकात सापळा रचून संशयित आरोपी विजय उत्तम सुतार (वय 35) आणि चंचल ओमप्रकाश सालवी ( वय 38) दोघी रा.गोलाणी मार्केट जळगाव या दोघांना अटक केली आहे. दोघांकडून चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे. पुढील कारवाईसाठी दोन्ही संशयित आरोपींना जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 


Protected Content

Play sound