जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वच जण सज्ज आहेत अशातच ओजस्विनी कला फाईन आर्टच्या विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली मखर तयार केले आहेत.
ओजस्विनी कला फाईन आर्टच्या विद्यार्थ्यांनी 20 प्रकारातील विविध आकारातील पर्यावरण पूरक मखर तयार केले आहेत. मखर बनविण्याचे हे पहिलेच वर्ष असून याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद आहे अशी माहिती फाईन आर्टचे विभागप्रमुख प्रा. मिलन भामरे यांनी दिली.
या उपक्रमासाठी के.सी.ई सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वदोडकर, मु.जे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स.ना भारंबे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतेसाठी प्रा. पियुष बडगुजर, प्रा. डिगंबर शिरसाळे, प्रा. पुरुषोत्तम घाटोळ यांनी परिश्रम घेतले.