कर्जोत येथे शेतातून पंपाची वायर चोरट्यांनी केली लंपास

रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कर्जोत येथे शेतात असलेल्या विहीरी वरुन मोटार पंपाची वायर चोरुन नेल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून अज्ञात चोरट्या विरुध्द रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या बाबत वृत्त असे की कर्जोत (ता. रावेर) येथील मनोज अरविंद पाठक यांच्या शेतातील सुमारे ८५ फुट मोटर पंपाची केबल अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. सकाळी शेतमालक मनोज पाठक शेतात गेले असता त्यांना केबल चोरीची घटना समजली याबाबत रावेर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते.

 

Protected Content