बापरे… पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून पतीने केला खून!

* मेहूणबारे ता. चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | पत्नीने मद्यपान केल्याच्या कारणावरून पतीने डोक्यात कुऱ्हाड घालून पत्नीची निघृण हत्या केल्याची थरारक घटना तालुक्यातील मेहूणबारे परिसरात घडली आहे. याप्रकरणी मेहूणबारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

सविस्तर वृत्त असे की, कुवरसिंग चत्तरसिंग पावरा (रा. मोहरतमाळ, राज्य मध्यप्रदेश) हे दाम्पत्य सालाने काम करण्यासाठी मार्च- २०२१ मध्ये तालुक्यातील मेहूणबारे शिवारात एकाच्या शेतात कामासाठी आले आहेत. आणि
त्याचठिकाणी एका शेडमध्ये वास्तव्यास आहेत. दरम्यान कुवरसिंग चत्तरसिंग पावरा यांनी आपल्या पत्नीला तु मद्यपान का केले आहे. असे विचारून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर वाद विकोपाला गेल्यावर घरात पडलेली कुऱ्हाड डोक्यात घालून पत्नीची निघृणपणे हत्या केली. हि धक्कादायक घटना १८ मार्च रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून निनुबाई कुवरसिंग पावरा असे मृत झालेल्या विवाहितेचा नाव आहे. सदर घटनेची माहिती मिळताच मेहूणबारे पोलिस सपोनि विष्णू आव्हाड, प्रकाश चव्हाण,धर्मराज पाटिल, सुभाष पाटिल,मोहन सोनावने, गोरख चकोर, हनुमंत वाघेरे, योगेश बोडके आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व घटनेबाबत पती कुवरसिंग यांना विचारपूस केली असता. त्यांनीच पत्नीची कुऱ्हाड डोक्यात घालून खून केल्याची कबुली दिली. याप्रकरणी त्याला मेहूणबारे पोलिसांनी ताब्यात घेतले असून ज्ञानेश्वर माळी यांच्या फिर्यादीवरून मेहूणबारे परिसरात भादवी कलम- ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सपोनि विष्णू आव्हाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.

Protected Content