महाविकास आघाडीचे २५ आमदार संपर्कात : दानवेंचा दावा

जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील २३ आमदार भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार रस्सीखेच आणि टोकाचा विरोध सुरू असतांनाच महाविकास आघाडी सरकारमधील २५ आमदार आपल्या संपर्कात असल्याचा मोठा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. महाविकास आघाडीतील २५ आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते. पण थोडीफार मदत करुन सावरले. निवडणुका येऊ द्या, एक-एक भाजपच्या वाघोरीत येऊन पडतील, असं विधान रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.

दरम्यान, दानवे यांना पत्रकारांनी २५ आमदारांपैकी काही आमदारांची नावे विचारली. पण दानवेंनी त्या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं. जे आमदार संपर्कात आहेत, त्यांची नावे सांगून मला त्यांची आमदारकी धोक्यात आणायची नाही. पण निवडणुकीच्या तोंडावर ते प्रवेश करणार आहेत, असं म्हणत दानवेंनी त्या आमदरांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्तही सांगितला. आता ही निवडणूक कोणती ? याचे उत्तर मात्र त्यांनी दिले नाही.

Protected Content