बसस्थानक आवारातून तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव प्रतिनिधी । शहरातील नविन बसस्थानक परिसरातून २५ हजार रूपये किंमतीची तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना आज ६ एप्रिल रोजी उघडकीला आली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हादाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, रफिक नसिर बागवान (वय-३२) रा. उस्मानिया मशिदजवळ सुप्रिम कॉलनी जळगाव हे पेंटरचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ३ एप्रिल रोजी त्यांच्याकडे नातेवाईक घरी आले होते. नातेवाईकांना सोडण्यासाठी शहरातील नवीन बसस्थानकात (एमएच १९ एडब्ल्यू  ४५५९) सायंकाळी ७ वाजता आले. बसस्थानकाच्या आवारात दुचाकी पार्किंग करून नातेवाईकांना सोडण्यासाठी बसस्थानकात केले. परत असल्यानंतर त्यांना जागेवर दुचाकी मिळून आली नाही. शोधाशोध करून दुचाकी मिळून आली नाही. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अजित पाटील करीत आहे. 

Protected Content