महायुतीचे उमेदवार आ.राजूमामा भोळे यांचा मेहरूण परीसरात प्रचार

meharun aksa nagar

जळगाव प्रतिनिधी । भाजपा-शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार राजुमामा भोळे यांची प्रचार रॅली मेहरूणमध्ये काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी महिलांकडून औक्षण करण्यात आले.

मेहरूण परीसरातील रेणुका माता मंदिर पासून, अक्सा नगर, मेहरूणमार्गे ममता हॉस्पिटीलपर्यंत काढण्यात आली. या रॅलीत सर्व समाजाच्या नागरीकांनी सहभाग नोंदविला. यावेळी शिवसेना नगरसेवक इब्राहिम मुसा पटेल, नगरसेविका सरिता नेरकर, भाजपा महिला आघाडी उपाध्यक्षा सना जहाँगीर खान, नगरसेविका पर्वताताई, रेखाताई कुलकर्णी, ज्योतीताई राजपूत, लताताई बाविस्कर, बूथ प्रमुख इंद्रिस शेख, यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

Protected Content