भाजपचे पुढील लक्ष महसूल : खासदार डॉ. सुजय विखे यांनी उपस्थित केला वाळू तस्करीचा मुद्दा

 

अहमदनगर वृत्तसंस्था  । महाविकास आघाडीतील दोघा मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर भाजपचे नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी महसूल विभागातील वाळू तस्करीचा मुद्दा उपस्थित करत सात दिवसांत यावर कारवाई झाली नाही, तर उपोषण करण्याचा इशाराच पारनेर तालुक्यात बोलताना दिला आहे.

 

डॉ. सुजय पाटील यांनी   वाळू तस्करीचा मुद्दा उपस्थित केला असून यासंबंधीचे पुरावे संकलित केल्याचा दावा केला आह. ज्या आमदारांचा वाळू तस्करीला पाठिंबा नाही, त्यांनीही आपल्यासमवेत उपोषणात सहभागी व्हावे, असे आव्हानही विखे यांनी दिले आहे. नाव न घेता त्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना या मुद्द्यावरून टार्गेट केल्याचे दिसून येते. राज्यातील वन विभागाचे तत्कालीन मंत्री शिवसेनेचे संजय राठोड आणि तत्कालीन गृहमंत्री राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांना विविध आरोप झाल्याने मंत्रिदाचे राजीनामे द्यावे लागले. तेव्हापासून अन्य काही खात्यांच्या मंत्र्यांचाही नंबर लागणार असल्याची वक्तव्य भाजप नेत्यांकडून करण्यात येऊ लागली होती. काही दिवसांपूर्वी यासाठी पुढाकार घेत भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र खासदार डॉ. विखे यांनी काँग्रेसचे थोरात यांच्या महसूल विभागाला बदल्या आणि वाळू तस्करीच्या मुद्द्यांवरून टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. वाळू तस्करांना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

 

Protected Content