बसवर भाजपचे झेंडे लावा, पण मजुरांना घेऊन जाण्याची परवानगी द्या ; प्रियांका गांधींची योगी सरकारला विनंती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आमच्या बसेस अजूनही उभ्या आहेत. या बसेसमुळे 92 हजार मजुरांना मदत मिळणार आहे. मात्र योगी सरकार या बसेसना परवानगी देत नाही. हवं तर बसवर भाजपचे झेंडे लावायचे असतील तर लावा, मात्र बस सोडा, अशा शब्दात प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. दरम्यान,  मागील काही दिवसांपासून मजुरांना सोडण्याऱ्या या बसेसवरून कॉंग्रेस आणि योगी सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

 

प्रवासी मजुरांना बस सुविधा पुरवण्यावरून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि उत्तर प्रदेश सरकारमध्ये सध्या वाद सुरु आहेत. प्रियांका गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन योगी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी बसवर भाजपचे झेंडे लावायचे असतील तर लावा, मात्र बस सोडा, असा विनंतीही प्रियांका गांधी यांनी केली. या बसेसमुळे 92 हजार लोकांना मदत मिळणार आहे. आमच्या बसेस अजूनही उभ्या आहेत, मात्र योगी सरकार या बसेसना परवानगी देत नाही. आतापर्यंत आम्ही 67 लाख गरजू नागरिकांना मदत केल्याची माहितीही प्रियांका गांधी यांनी यावेळी दिली. प्रियंका गांधींनी 1 हजार बसेस पाठवण्याची परवानगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागितली. परंतू दोन दिवस त्यावर युपी सरकारने कुठलाही प्रतिसाद दिला नव्हता. त्यानंतर गाझियाबादमध्ये 18 मे रोजी मजुरांचा मोठा उद्रेक झाला. त्यामुळे यूपी सरकारवर टीका व्हायला लागली. मग त्याच दिवशी अचानक यूपी सचिवांकडून परवानगी पत्र आले. परंतू योगी सरकारने तांत्रिक बाबी पुढे करत कॉंग्रेसवर टीका केली. दरम्यान, अजूनही कॉंग्रेसच्या बसेस यूपीच्या सीमेत प्रवेश करू शकलेल्या नाहीत. अगदी काल यूपी काँग्रेस अध्यक्षांनी धरणं आंदोलन केले होते.

Protected Content