पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धुळे- पारोळा बसमध्ये प्रवास करताना अज्ञात चोरट्याने बॅगेतून २ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून येण्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात पारोळा पोलीस ठाण्यात आज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आनंदा जगन्नाथ सोनटक्के (वय-३३) रा.पारोळा हे एसटी डेपोमध्ये वाहतूक निरीक्षक म्हणून नोकरीला आहे. शनिवार ३ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान आनंदा सोनटक्के हे धुळे येथून बस क्रमांक (एमएच 14 बीटी 737) ने धुळ्याहून पारोळा येथे आले. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बॅगेतून सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण २ लाखात ८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून येण्याचे समोर आले आहे. या संदर्भात सोनटक्के यांनी पारोळा पोलीस ठाण्यात घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.- पुढील तपास पोलीस नाईक योगेश जाधव करीत आहे.