महिलेचे बंद घर फोडून रोकडसह सोन्याचे दागिने लांबविले

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील श्रीनगर परिसरात महिलेचे बंद घर फोडून २ लाख ५६ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हेमा अर्जून ढोलपूरे (वय-२७) रा. श्रीनगर विठ्ठल मंदीरासमोर भुसावळ हे २५ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर दरम्यान त्यांचे घर बंद करून बाहेरगावी गेल्या होत्या. घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले. यात एकुण १ लाख रूपयांची रोकड आणि १ लाख ५६ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा एकुण २ लाख ५६ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी महिलेने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार मोहम्मद अली सैय्यद करीत आहे.

Protected Content