बलिदान दिनानिमित्त रणरागिणींकडून राणी लक्ष्मीबाई यांना मानवंदना !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्ताने शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकातील स्मारकाजवळ हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने आज मानवंदना देण्यात आली.

 

यावेळी जळगाव नगरीच्या महापौर जयश्री महाजन, भाजपच्या माजी महापौर सीमा भोळे, शिवसेनेच्या शोभा चौधरी, सखी मंचाच्या रेखा कुलकर्णी, माजी प्राध्यापिका प्रज्ञा जंगले, रणरागिणी शाखेच्या सायली पाटील, भावना पाटील, ईश्वरी उगले यांच्यासह हिंदु धर्मप्रेमी बांधव उपस्थित होते. या वेळी रणरागिणी सायली पाटील हिने लाठीचे प्रकार करून राणींना मानवंदना दिली. तसेच रणरागिणी शाखेकडून महापौर महाजन याना स्मारकाच्या संवर्धन संदर्भात दिलेल्या निवेदनावर तत्परतेने कार्यवाही करून स्मारकाचे जतन आणि संवर्धन चे काम केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्वश्री गजु तांबट, सागर महाजन, बाळू चौधरी, अनिल चौधरी, मोहन तिवारी, धनंजय चौधरी यांनी सहकार्य केले.

 

या वेळी महापौर जयश्री महाजन म्हणाल्या की, प्रत्येक महिलेला, मुलीला स्वतःचे रक्षण करता आले पाहिजे. यासाठी हिंदु जनजागृती समिती देत असलेला प्रशिक्षणाचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. याचा लाभ सर्वानी घेतला पाहिजे. झाशीच्या राणीचे बलिदान आपल्याला प्रेरणा देते, खोट्या प्रेमाला मुलींनी बळी पडू नये, माता आणि पिता यांचे प्रेम हे खरे प्रेम आहे. युवतींनी आधी स्वकर्तृत्वाने स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. मला जे निवेदन दिले होते स्मारकाच्या दुरुस्तीविषयी त्यानुसार काम सुरु केले असून लवकरच अन्य उरलेली कामेही लवकर पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

रणरागिणीच्या सायली पाटील यांनी सांगितले कि, आजच्या युवतींनी झाशीच्या राणीचा आदर्श घेतला तर कोणतीही मुलगी धर्मांधांच्या खोट्या प्रेमाला बळी पडणार नाही, कोणत्याही युवतीचे ३५ तुकडे आपल्याला सापडणार नाहीत, द केरला स्टोरी सारख्या फिल्म बघायला लागणार नाहीत त्यासाठी प्रत्येकाने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतले पाहिजे. सौ प्रज्ञा जंगले म्हणाल्या की, मुलींना शाळा, महाविद्यालयात जाऊन आपल्या धर्माविषयी शिक्षण देऊन त्यांचे प्रबोधन करून त्यांना प्रशिक्षित करणे आवश्यक आहे.

 

समितीने दिलेल्या निवेदनामुळे स्मारकाचा चेहरा मोहरा पालटला !

शहरातील राणीच्या स्मारकाची स्थिती दयनीय झालेली असताना त्याची आवश्यक डागडुजी करावी, याविषयी समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने १६मे या दिवशी महापौर महाजन याना निवेदन दिले होते. त्याचा परिणाम म्हणून बलिदान दिनी स्मारकाचा चेहरामोरा पालटला.

Protected Content