जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अनुराग स्टेट बँक कॉलनीमध्ये एकाचे बंद घर फोडून घरातून २२ हजार रुपये किमतीचे लॅपटॉप इलेक्ट्रॉनिक साहित्य लांबवल्याची घटना उघडकीला आली आहे. यासंदर्भात शनिवार ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
शहरातील अनुराग स्टेट बँक कॉलनीत आनंद कमलकिशोर भंडारी हे वास्तव्यास असून ते खासगी नोकरी करुन उदनिर्वाह करतात. त्यांच्या आईची तब्येत खराब असल्याने २९ जानेवारी रोजी ते अमरावती जिल्ह्यातील धामनगाव येथे गेले होते. बुधवार ८ फेब्रुवारी रोजी त्यांनी त्यांच्य ओळखीचे राजू शिरसाळे यांना घराकडे जावून पाहणी करण्यास सांगितले. दुसर्या दिवशी रात्रीच्या सुमारास शिरसाळे हे त्यांच्या घराकडे गेले असता, त्यांना घराच्या किचनचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी लागलीच भंडारी यांना फोनवरुन माहिती दिली. दरम्या, शिरसाळे यांनी घरात जावून पाहणी केली असता, त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला. त्यानंतर नवीन कुलूप आणून त्यांनी घराला लावले.
शुक्रवारी १० फेब्रुवारी रोजी भंडारी हे जळगावात आल्यानंतर त्यांनी घरातील सामानाची पाहणी केली. यावेळी त्यांना कंपनीचा लॅपटॉप, हार्डडिस्क, साऊंड सिस्टीम, वायफाय डोंगल असा एकूण २२ हजारांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे समजले. त्यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार शनिवार ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.