बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारची सुरक्षा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर हल्ला करण्याचे प्रकार सुरू असतांना या आमदारांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारने सुरक्षा दिली असून त्यांच्या निवासस्थानाच्या भोवती सीआरपीएफचे जवान दाखल झाले आहेत.

कालपासून राज्यात बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. अनेक आमदारांच्या कार्यालयांवर हल्ले करण्यात आले. यात तानाजी सावंत यांचे पुणे येथील कार्यालय फोडण्यात आले. तसेच श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावरही हल्ला करण्यात आला. राज्यात अनेक ठिकाणी याच प्रकारचे प्रकार घडले. यामुळे वातावरण विकोपाला जाण्याची शक्यता निर्माण झाली होती.

कालच खासदार नवनीत राणा यांनी बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारने सुरक्षा देण्याची मागणी केली होती. या पार्श्‍वभूमिवर आज दुपारपासून बंडखोर आमदारांच्या निवासस्थानी केंद्र सरकारने सुरक्षा पुरविल्याचे दिसून आले आहे. या आमदारांच्या घराबाहेर सीआरपीएफचे सशस्त्र जवान तैनात करण्यात आले आहेत. मुंबईतील आमदार यामिनी जाधव, प्रताप सरनाईक, तानाजी सावंत आदींसह अन्य आमदारांना ही सुरक्षा पुरविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Protected Content