भुसावळ : प्रतिनिधी। वरणगांव येथिल पोलीस स्टेशनला कार्यरत व लाचखोरीच्या गुन्ह्यात एसीबीने कारवाई केलेले फौजदार सुनिल वाणी यांच्या घरात ४ लाखाची रोकड आढळून आली .
साकेगांव येथिल रेतीचे डंपर (क्र एम .एच.४० .एन.४o८६ ) वर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात वरणगांव पोलीस ठाण्याचे गणेश शेळके व सुनिल वाणी यांचेवर १० हजार रुपयांच्या लाचप्रकरणी एसीबी पथकाने कारवाई केली होती . या पैकी पीएसआय सुनिल वाणी यांच्या भुसावळ येथिल भिरुड कॉलनीतील घराची झडती घेतली गेली त्यावेळी ४ लाखाची बेहिशेबी रोकड त्यांच्या घरात आढळून आली . भुसावळ न्यायालयात त्यांना हजर केले असता न्या एस .पी. डोरले यांनी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती . पुढील कारवाईची नागरिकांमध्ये उत्सुकता लागल्याची सर्वत्र चर्चा आहे .