खळबळजनक ! मुक्ताईनगरात दरोडा : ३० लाखांचे दागिने लंपास

मुक्ताईनगर-पंकज कपले | शहरातील अंबिका ज्वेलर्स या दुकानावर धाडसी दरोडा टाकण्यात आला असून यात चोरट्यांनी सोने आणि चांदी यांचे एकत्रीतपणे सुमारे ३० लाख लाखांचे दागिने लंपास करण्यात आल्याचे आज उघडकीस आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

शहरातील भुसावळ रोडवर असलेल्या अंबिका ज्वेलर्स या सराफा दुकानात रात्री धाडसी दरोडा घालण्यात आला. आज सकाळी ही बाब उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने दुकानाच्या मालकांशी संपर्क केला असता त्यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजला याबाबतची माहिती दिली.

अंबिका ज्वेलर्सचे संचालक अनिल शूरपाटणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी दुकानात दरोडा पडल्याची माहिती मिळाली. यात सुमारे २५ लाख रूपयांची चांदी तर पाच लाख रूपयांच्या सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस स्थानकाला माहिती दिली असून पंचनामा करून याबाबत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर जळगावहून तपासासाठी श्‍वान पथक निघाल्याची माहिती सुध्दा संचालकांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिली आहे.

दरम्यान, भर बाजारपेठेत असलेल्या सराफा दुकानातील या धाडसी दरोड्यामुळे परिसरात एकच खळबळ उडालेली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: