फैजपूर शहर कोरोनामुक्त; दोन्ही रूग्ण उपचारानंतर घरी !

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । शहरात दोन कोरोना रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, उपचारांनतर त्या दोन्ही रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून आता फैजपूर शहर हे कोरोना मुक्त झाले आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील सिंधी कॉलनी परिसरात असलेले रहिवाशी हे कामा निमित्त अमदाबाद येथे गेले होते लॉकडाऊन झाल्याने ते तेथेच अडकून होते. दीड महिन्या नंतर ते शहरात दाखल झाले त्यांच्यात कोरोनाची लक्षण दिसू लागल्याने त्या दोघे आई व मुलीला क्वॉरंटाईन करण्यात आले होते. यानंतर दोन दिवसांनी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती त्यानंतर दक्षिण बाहेर पेठ व सिंधी कॉलनी लागलीच सिल करण्यात आले.

या दोन्ही रूग्णांवर कोविड रूग्णालयात उपचार करण्यात आले. या उपचारात त्यांनी कोरोनावर मात केली. त्यांची रिपोर्ट निगेटीव्ह आल्यामुळे सोमवारी रात्री या दोन्ही माय लेकी घरी परतल्या. दरम्यान, शहर कोरोना मुक्त झाले असले तरी नागरिकांना खबरदारी घ्यावीच लागणार आहे.

Protected Content