राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न-राऊत

मुंबई प्रतिनिधी । केंद्र सरकार महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या प्रयत्नात असून यात त्यांना यश मिळणार नसल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

राज्यभरात कोरोनाचा प्रकोप वाढला असतांना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काल नारायण राणे यांनी राज्यपालांची भेट घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. यानंतर मातोश्रीवर महत्वाची बैठक झाली. या पार्श्‍वभूमिवर, आज संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर आरोप केले. ते म्हणाले की, राजभवनातून निमंत्रण आल्याने मी राज्यपालांना भेटायला गेलो होतो. चर्चेदरम्यान राज्यपालांनी राज्य सरकारला करोनाची स्थिती हाताळणं कठीण जात असल्याचा उल्लेख केला. पण मी त्यांना परिस्थिती नियंत्रणात असून मुख्यमंत्री सर्वात पुढे राहून लढा देत आहेत. प्रत्येक दिवशी महत्त्वाच्या उपाययोजना केल्या जात आहेत असं सांगितलं. तर केंद्र सरकार राज्यात राष्ट्रपती राजवटीच्या तयारीत असले तरी यात त्यांना यश मिळणार नसल्याचा दावा देखील राऊत यांनी केला आहे.

Protected Content