फैजपूर येथे ५० हजारांचा गुटखा जप्त;गुन्हा दाखल

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथे अवैध रित्या विकल्या जाणार्‍या गुटखा विक्रेत्यावर पोलिसांनी धाड घालून ५० हजाराचा गुटखा हस्तगत करून त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून मिल्लतनगर येथे गुटखा विक्री होत असल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, हे कॉ उमेश पाटील,पो कॉ विनोद पाटील, महिला पोलीस भिलाला यांनी मिळालेल्या गुप्त माहिती नुसार काल रात्री धाड टाकली. ५० हजार ७२ रुपयांचा गुटखा व सुगंधी तंबाखू पोलिसांनी हस्तगत केला. या कारवाई प्रकरणी अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांनी शनिवारी भेट देऊन गुन्हा दाखल केला आहे या कारवाईने अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे तपात हे कॉ इक्बाल सैय्यद करीत आहेत.

Protected Content