फैजपूर येथील जे.टी. महाजन इंजिनिअरिंग कॉलेजात भव्य रक्तदान शिबिर

फैजपूर ता. यावल (प्रतिनिधी ) येथील जे.टी. महाजन इंजिनिअरिंग कॉलेजात स्व. दादासाहेब जे.टी. महाजन व स्व. डिगंबरशेठ नारखेडे यांच्या स्मृतीप्रित्यार्थ आज भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबीरात एकुण ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

 

याबाबत माहिती अशी की, स्व. दादासाहेब जे.टी. महाजन व स्व. डिगंबरशेठ नारखेडे यांच्या स्मृतीप्रित्यार्थ आज शुक्रवार २२ ऑक्टोबर रोजी शहरातील जे.टी. महाजन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले.  टीएमइ सोसायटीचे अध्यक्ष शरद महाजन यांनी फीत कापून उद्घाटन करण्यात आले. शिबीरात५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले आणि  भारत विद्यालय न्हावी येथे वृक्षारोपण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ 22 ऑक्टोबरला न्हावी येथून झाला. जळगाव सिव्हिल हॉस्पिटल व न्हावी ग्रामीण रुग्णालय यांच्या सहकार्याने हा रक्तदानाचा कार्यक्रम यशस्वी झाला.

याप्रसंगी पी.एच. महाजन, अविनाश फिरके, नितीन सर, उमेश बेंडाळे, किशोर कोलते, अनिल लढे, पराग वाघूळदे, हर्षद महाजन, जयंत बेंडाळे, यशवंत तळेले, प्रवीण वारके, प्रा.एच. डी. चौधरी, प्रा. वाय.आर. भोळे, प्रा.व्ही. व्ही. महाजन, प्रा. ओ. के. फिरके, डॉ. के. जी. पाटील, पी. एस चौधरी व जे. टी. महाजन इंजिनिअरिंगच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. तसेच त्यानंतर संपूर्ण यावल, रावेर या दोन्ही तालुक्यामध्ये ठीकठिकाणी हा रक्तदानाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

Protected Content