पाडळसे येथे नि:शुल्क नेत्र तपासणी शिबीर

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील पाडळसे येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने विकास कार्यकारी सोसायटी, पाडळसे तालुका यावल डॉ. कुंदन फेगडे मित्र परिवारातर्फे नि:शुल्क नेत्र तपासणी शस्त्रक्रिया शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

सदर पाडळसे गावात आयोजीत या भव्य शिबिरात ११५ सहभागी झालेल्या रुग्णांची निशुल्क नेत्र तपासणी करण्यात आली  तर मोतीबिंदू निदान झालेल्या ११ रुग्णांनाची  प्राथमिक तपासणी करून त्यांना शस्त्रक्रीयेसाठी कांताई नेत्रालय जळगाव येथे पाठवण्यात आले. सदरील शिबिरात कांताई नेत्रालय जळगाव येथील शिबीर नियोजक युवराज देसर्डा यांनी मार्गदर्शन केले. व नेत्र चिकित्सक डॉ रोहित गैतम यांनी रुग्ण बांधवांची तपासणी केली.

यावेळी  पाडळसे गावाचे उपसरपंच खेमचंद कोळी, डॉ. कुंदन फेगडे व युवराज देसर्डा यांनी उपस्थित रुग्णांना आपले मार्गदर्शन  केले आधार नसलेल्या वृध्दांच्या हाताला आधार कुणी द्यावा  यावेळी डॉ.कुंदन फेगडे यांनी रुग्ण बांधवांना आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, आजकाल वृद्ध आई वडील मुलांना नकोसे वाटतात त्यांना सांभाळणं नको वाटतं आशा वेळी आधार नसलेल्या हाताला आधार कुणी द्यावा, आशा प्रश्न मला कायम पडायचा म्हणून मी व माझा मित्र परिवाराच्या सहकार्याने संपूर्ण यावल तालुका मोतीबिंदू मुक्त करण्याच्या उद्दिष्ठे डोळ्यांसमोर ठेऊन हे कार्य हाती घेतले व  माझा संपूर्ण मित्र परिवाराच्या सहकार्याने यावल तालुक्यात आतापर्यत २१ शिबिराच्या माध्यमातून वृद्ध सेवा करण्याचे भाग्य मला व माझ्या मित्र परिवाराला लाभले. जो पर्यत संपूर्ण यावल तालुका मोतीबिंदू मुक्त होत नाही तो पर्यत हि सेवा व कार्य अपूर्ण सोडणार नाही अशी इच्छा व्यक्त केली.

या  कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पाडळसे गावाचे सरपंच ज्ञानेश्वर तायडे तर कार्यक्रमाचे उद्धघाटन डॉ.कुंदन फेगडे  यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेला व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला  माल्यार्पण अर्पण करून भारतरत्न डॉ.  बाबासाहेब  आंबेडकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून कार्यक्रमाचे उद्धघाटन करण्यात आले. यावेळी डॉ.कुंदन फेगडे, ज्ञानेश्वर तायडे (सरपंच), खेमचंद कोळी (उपसरपंच), डॉ. उदय चौधरी, राहुल पाटील (माजी प्रभारी उपसरपंच), सुरेश खैरनार (पोलीस पाटील), मुकुंदा कोळी, वासुदेव कोळी, आरिफ पटेल, शेखर तायडे, शांताराम कोळी, नथू कोळी, किशोर कोळी, सय्यद नूर, बापूभऊ तायडे तसेच गावातील जेष्ठ प्रतिष्टीत सामाजिक कार्यकर्ते आदींची उपस्थिती होते.  या कार्यक्रमाला डॉ.कुंदन फेगडे यांचे संपर्कप्रमुख  सागर लोहार, मनोज बारी , विशाल बारी,  राहुल पाटील  आदींनी कार्यक्रमासाठी  परिश्रम घेतले.

 

Protected Content