फैजपूर मंडळातील २२७ सात बारे तगाई , बंडिंग मुक्त

 

फैजपूर : प्रतिनिधी   । महसूल खात्याकडून आता फैजपूर मंडळातील २२७ शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांवरील तगाई , बाँडिंग ,  आयकट अशा देणे दाखवणाऱ्या कालबाह्य नोंदी काढून टाकण्यात आल्या आहेत

 

विभागीय आयुक्त  यांच्या निर्देशानुसार  व जिल्हाधिकारी ,  फैजपूरचे उपविभागीय अधिकारी , यावलचे तहसिलदार यांचे मार्गदर्शनाखाली फैजपूर मंडळातील फैजपूर, न्हावी प्र.यावल, आमोदे, मारूळ, बोरखेडा बु, विरोदे, पिंपरूड, वढोदे प्र.सावदा, हंबर्डी या गावातील ७/१२ मध्ये असलेल्या इतर हक्कातील कालबाह्य नोंदी कमी करण्याबाबत विशेष मोहीम राबविण्यात आली. ही  मोहीम १ ऑगस्ट या महसुल दिनी सुरु करण्यात आली. ज्या ७/१२ वर जुने तगाई, बंडिंग, आयकट बोजे दाखल होते  ते शेतकऱ्यांना  अडचणीचे ठरत होते  सर्व बोजांचा शोध तलाठी यांनी घेतला  शासन निर्णयानुसार फैजपूर –४, न्हावी प्र.यावल – १७८, बोरखेडा बु – ३९, विरोदे –१, वढोदे प्र. सावदा –१, पिंपरूड -४ असे एकूण २२७ सातबारावरील इतर हक्कातील तगाई, बंडिंग, आयकट बोजे या कालबाह्य नोंदी कमी करण्यात आल्या.

 

तगाई, बंडिंग, आयकट  इत्यादी कर्ज हे शासनाने १९७०-८० च्या कालखंडात शेती उपयुक्त कामासाठी वाटप केले होते. कालांतराने  कर्ज शासनाने माफ केले होते. परंतु त्या कर्जाची नोंद आजही ७/१२ वर दिसत  होती. ७/१२ मध्ये असलेल्या इतर हक्कातील तगाई, बंडिंग, आयकट बोजे या कालबाह्य नोंदी  शेतकऱ्यांना  खरेदी विक्री ,बँकसाठी अडथळा ठरत होत्या.

 

या  मोहिमेचे वैशिष्ट म्हणजे यासाठी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा अर्ज अथवा कागदपत्रे घेण्यात आलेले नाही. तलाठी यांनी स्वतच कालबाह्य नोंदीचा शोध घेऊन फेरफार दाखल केले व मंडळ अधिकारी यांनी  फेरफार प्रमाणित केले.

मोहिमेच्या यशस्वीतेसाठी  जे. डी. बंगाळे ( मंडळ अधिकारी , फैजपूर ) यांच्या मार्गदर्शनाखाली  प्रशांत जावळे  ( तलाठी फैजपूर ),  एम. पी . खुर्दा  ( तलाठी आमोदे ) , श्रीमती लीना राणे  ( तलाठी न्हावी प्र.यावल) , कु. एच . डी. सांगोळे ( तलाठी विरोदे ) , लिलाधर सपकाळे ( कोतवाल आमोदे ) , तुषार जाधव ( कोतवाल फैजपूर ) , श्रीमती बारी ( कोतवाल न्हावी प्र.यावल ) आदींनी  परिश्रम घेतले.

 

Protected Content