प्रवासी म्हणून बसविले, तेच ‘बंटी-बबली’ निघाले : सुदैवाने वाचले तरूणाचे प्राण !

यावल-अय्यूब पटेल | आपल्या कारमध्ये प्रवासी म्हणून बसविलेल्या दाम्पत्याने त्या वाहकाला बेशुध्द करून फेकून देत त्याचे वाहन घेऊन पोबारा केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, यावल शहरातील आयेशानगर भागातील रहिवासी आसीफ नुरमोहम्मद पटेल ( वय २९ वर्ष ) हा तरूण वाहन चालक म्हणून काम करतो. त्याला मुंबई येथे ट्रिप मिळाली होती. त्या लोकांना सोडून तो तो दिनांक २१ मे रोजी रात्री मुंबई हुन यावल कडे त्याच्या ताब्यातील चारचाकी स्विफ्ट डीझायर वाहन क्रमांक एमएम१९बीयु६५८५या वाहनाने रात्री निघाला.

दरम्यान, कसारा गावापासुन जवळच रस्त्यावर त्याला एका दाम्पत्याने थांबवत कारने जाण्याचे सांगीतले. त्यावर रात्रीची वेळ आहे महिला सोबत आहे हा विचार करून वाहनचालक आसीफ पटेल यांने दोघांना आपल्या गाडीत बसविले.

हा प्रवास सुरू असतांना मालेगाव जवळ आले असता दोघ पती पत्नीच्या आग्रहा खातर जेवणासाठी एका हॉटेलवर थांबले. याप्रसंगी या दाम्पत्याने त्यांच्याकडील पोळ्या त्याला खाऊ घातल्या. जेवण झाल्यावर गाडी पुढील प्रवासासाठी निघाली असता आसीफची शुध्द हरपली. यानंतर त्या दोघ पती पत्नी म्हणार्‍यांनी आसीफ पटेल यास बेशुद्ध अवस्थेत शिरपुर पळासनेर जवळ फेकुन वाहन घेवुन पोबारा केला.

इकडे आसीफ हा रस्त्यावर बेशुध्द होऊन पडला असतांना त्या दाम्पत्याने गाडी घेवुन पलायन केले. मात्र त्या दोघांना पोलीसांनी नाशिक टोल नाक्यावर वाहनाची कागदपत्रे मागितले असता त्याच्या उडवाउडवीच्या उत्तराने पोलिसांनी ताब्यात घेतले. यातून या घटनेची सविस्तर माहीती समोर आली.

तर, दुसरीकडे आसीफ पटेल हा वाहनचालक काही तासाने शुद्धीवर आल्याने काही काळ पायदळ व काही अंतर विनंती करुन वाहनाने प्रवास करीत अखेर आज यावल येथे घरी पहोचला. दरम्यान, अद्यापही तो चांगल्या मनस्थितीत असल्याने याची फार काही माहिती देऊ शकला नाही. मात्र त्याने ज्यांना प्रवासी म्हणून बसविले, त्यांनीच त्याला फसवल्याचे यातून दिसून आले आहे. अर्थात, बेशुध्दावस्थेत असतांनाही त्याला कोणत्या वाहनाने धडक दिली नाही हे सुदैव ! याचमुळे त्याचे प्राण वाचले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content