फैजपूरात फिरत्या न्यायालयामध्ये सहा प्रकरणांचा निपटारा

फैजपूर प्रतिनिधी । कायद्याची व शासनाच्या विविध योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यात यावी, असे प्रतिपादन न्यायमूर्ती एम. एस. बंचारे  यांनी केले. फैजपूर पोलीस ठाण्याच्या आवारात आज फिरते लोक अदालतच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावल न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस.बंचारे होते. सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखडे, उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, उपनिरीक्षक मसुलीद्दीन शेख, ॲड. व्ही एम परतणे, ॲड. एनपी मोरे, ॲड. डी.आर. बाविस्कर, सरकारी वकील ॲड. फरीद शेख, ॲड. ए. आर. सुरळकर, ॲड. नितीन चौधरी, ॲड. यु. सी. बडगुजर, ॲड. ए.एम. कुलकर्णी, ॲड. जी.के.पाटील, ॲड. आकाश चौधरी, ॲड. हेमांगी चौधरी, ॲड. सिद्धार्थ लोंढे, ॲड. नितीन भावसार, मंडळाधिकारी जे.डी.बंगाळे, पी.एल.व्ही. अजय बढे, हेमंत फेगडे, शशिकांत वारूळकर, नंदकिशोर अग्रवाल, न्यायालयीन कर्मचारी चंद्रकांत झोपे, गजानन लाड, ज्ञानेश्वर गावंडे, रुपाली नेवे, दर्पण पाटील, राहुल रायपुरे, विनोद अवचार मल, सुशीला भिलाल, हेमंत सांगळे,अनिल महाजन, श्रीकांत इंगळे, व्यापारी पक्षकार  उपस्थित होते.

ॲड. नितीन चौधरी यांनी मेडिटेशन लोक अदालत, ॲड. उमेश बडगुजर, प्ली बार्गेनिंग, ॲड. देवेंद्र बाविस्कर, पर्यावरण, ॲड. सिद्धार्थ लोंढे, ॲड. ए.आर. सुरळकर,  फैजपूर मंडळाधिकारी जेडी बंगाळे (महसूल कायदा), सपोनि प्रकाश वानखडे (लैंगिक व बालमजूर), सरकारी वकील फरीद शेख (दखलपात्र, अदखलपात्र), मेडिअशन याबद्दल कायद्याची माहिती देण्यात आली. कार्यक्रमासाठी यावल न्यायालयाची कर्मचारी व  पोलीस स्टेशन यांनी परिश्रम घेतले.

Protected Content