यावल शहरासह तालुक्यातील ग्रामीण परिसरात दुर्गादेवीचे शांतातेत विसर्जन

यावल प्रतिनिधी । कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभुमीवर देशात आणी महाराष्ट्र राज्यात यंदाचे नवरात्र उत्सव अत्यंत साधेपणाने साजरे करण्यात येवुन आज दुर्गादेवीच्या विसर्जनासह उत्सवाची सांगता करण्यात आली. यावल तालुक्यातील परिसरातील दुर्गादेवीचे विसर्जन शांततेत करण्यात आले.

संपुर्ण देशासह महाराष्ट्र राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणुसंसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र खबरदारीचे उपाय म्हणुन शासनाने नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा प्रश्न उध्दभवणार नाही म्हणुन कोविड १९ सनसर्जन्य परिस्थितीत चा विचार करता १७ऑक्टोम्बर पासून सुरु असलेल्या नवरात्रोत्सवाची सांगता अगदी साध्य पद्धतीने झाली.

यावल तालुक्यातील महेलखेडी येथील संत गवरोबा दुर्गात्सव मंडळाने आपल्या हस्त कलेतून साध्या मातीने बनविलेली दुर्गा मातेची मूर्ती यात रेखाटलेले कोरोना मुक्ती होता असल्याचा देखावा साजरा करण्यात आला आहे . आज दिनांक २६ ऑक्टोबर रोजी नवरात्रत्सवाची सांगता होवुन शासन आदेशाचे नियमांचे अत्यंत काटेकोर पालन करण्यात येवुन कुठलेही वाद्य न लावता अगदी साध्या पद्धतीने देवीची विसर्जन मिरवणूक काढुन निरोप देण्यात आले , दरम्यान दुर्गात्सव मंडळाच्या वतीने सोशल डिस्टसिंगसह मास लावून गर्दी टाळून लहान मंडळींना गर्दी पासून दूर ठेवण्यात आले .त्याच बरोबर आशिष राजू झुरकाळे यांच्या मंडळाने देखील अगदी सद्यस्थितीचे भान ठेवुन दुर्गादेवीचे विसर्जन केले, विसर्जन मिरवणुकीत कोरोना नियमाचे पालन करण्यासाठी कपिल नामदेव झुरकाळे राजू झुरकाळे बाळू झुरकाळे व संत गवरोब मंडळाचे सदस्य यांनी प्रयत्न केले. यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पोलीस सहकारी ललित इंधाटे, पोलीस कर्मचारी सिकंदर तडवी, गावाचे पोलीस पाटील मधुकर महाजन यांच्यासह अन्य गावकरी मंडळीने कायदा सुव्यवस्थेचे पालन करीत बंदोबस्त चोख ठेवले अतिश्य शांततेच्या वातावरणात कोणतेही अनुचित प्रकार न घडला नाही विसर्जन मिरवणुक पार पाडल्याबद्दल पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांनी सर्व दुर्गात्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचे ग्रामस्थांचे विशेष आभार मानले .

तालुक्यातील ग्रामीण भागाचा उत्साहात आणि शांतते मिरवणूक
यावल शहरातील ४० व तालुक्यातील ग्रामीण भागातील १२९ अशा १६९ मंडळांनी घेतलेल्या नवरात्री उत्सवाची सोमवारी सांगता झाली आहे. उत्सवात सहभागी असलेल्या कोणत्याही मंडळाने यंदाच्या उत्सवाची मिरवणूक काढली नसल्याचे दिसूनआली . परंपरागत दुर्गादेवीच्या विसर्जनाच्या प्रसंगी कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न उद्धभवु नये यासाठी शहरातील सर्व बंद ठेवण्यात येत असे, मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे विसर्जन मिरवणुकीच्या सर्व कार्यक्रमांना पुर्णपणे बंदी घालण्यात आल्याने यंदा मात्र शहरातील व्यावसाईकांनी आपली दुकाने सुरू ठेवली होती. पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार , पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले आणी त्यांचे सर्व सहकारी स्थानिक पोलीसांनी तथागृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आपला बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता .

Protected Content