चुंचाळे जि.प. शाळेत प्रजासत्ताक दिन हर्षोल्हासात

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा चुंचाळे येथे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रदीप वानखेडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी संविधानाच्या प्रास्ताविक माझी वसुंधराचे सामुहिक वाचन शाळाचे मुख्यध्यापक गिरीश सपकाळे यांनी केले केले व उपस्थितांनी यावेळी शपथ घेतली. याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सुरेश पाटील हे होते तर कार्यक्रमाचे  प्रास्ताविक शाळेतील शिक्षक राजू सोनवणे यांनी केले, उपस्थितांचे आभार शिक्षक राहूल वाणी यांनी मानले  सदर कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आमिर तडवी, पंडित मराठे, मधूकर कोळी यांच्यासह अध्यक्ष यांचे प्रतिनिधी लुकमान तडवी, सदस्य प्रतिनिधी फत्तू तडवी, विश्राम पाटील, इतबार तडवी,  सरपंच प्रतिनिधी संजय पाटील, शिक्षक मजित तडवी ,त्रिपाठी  ग्रामसेवक प्रतिभा भालेराव यांच्यासह विद्यार्थी व गावातील मान्यवर मंडळी आणी ग्रामस्थ यांनी ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहुन राष्ट्रीय ध्वजाला सलामी दिली.

 

 

 

Protected Content