फैजपूरात तीन कोरोनाबाधित रूग्ण आढळले; प्रशासनाची चिंता वाढली

फैजपूर प्रतिनिधी । फैजपूर कोवीड सेंटरने संशयित कोरोना बाधितांचे स्वॅब पाठविले होते. त्यापैकी २३ जणांचा अहवाल आज सकाळी प्राप्त झाला असून त्यापैकी तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्‍ह आला आहे. एकुण कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा पाच झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडल्याने पुन्हा धावपळ सुरू झाली आहे.

गेल्या आठवड्यात आठवड्यात फैजपूर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. तर दुसऱ्या दिवशी आणखी एकाला बाधा झाली होती त्यांनतर या पोलीस अधिकाऱ्याच्या परिवारातील व संपर्कातील १३ पोलिसांचे तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आले होते तसेच अन्य अशा एकूण ८० जणांचे स्वॅब घेऊन तपासणी साठी पाठविण्यात आलेले होते. त्यापैकी २३ जणांचे अहवाल आज प्राप्त झाले असून तीन रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहे. आढळून आलेल्या कोरोना बाधितांमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचा व दोन पोलिसांचा समावेश आहे. यातील बाधित एक पोलीस भुसावळ येथे वास्तव्यास आहे. त्याचप्रमाणे फैजपूर येथे दुसरा बाधित पोलीस राहत असलेला परिसर पालिका प्रशासनाने सील केला आहे. दरम्यान ६ पोलिसांसह एक होमगार्ड पोलीस अधिकाऱ्याच्या परिवारातील अन्य सदस्य तसेच पोलीस अधिकाऱ्यावर उपचार करणारे डॉक्टर, नर्स यांच्यासह २० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.

Protected Content