फैजपूरच्या उपनगराध्यक्षपदी नयना चौधरी (व्हिडीओ)

फैजपूर प्रतिनिधी । फैजपूर पालिकेच्या उपनगराध्यक्षपदाची निवड आज ( दि ८ ) करण्यात आली. उपनगराध्यक्षपदी नयना चंद्रशेखर चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली

रशीद नसीर तडवी यांनी उपनराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर फैजपूर पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी यावलचे तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्या अध्यक्षतेखाली आज ऑनलाइन विशेष सभा बोलाविण्यात आली होती या निवडीसाठी अपक्ष गटाच्या नगरसेविका सौ नयना चौधरी यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आल्याने सौ नयना चंद्रशेखर चौधरी यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली .

दरम्यान या उपनगराध्यक्ष निवडीसाठी या ऑनलाईन सभेप्रसंगी यावलचे तहसीलदार जितेंद्र कुंवर,नगराध्यक्षा सौ महानंदा होले, मुख्याधिकारी किशोर चव्हाण सभागृहात उपस्थित होते. निवडीचे कामकाज सभा लिपिक सुधीर चौधरी, बांधकाम विभागाचे वरिष्ठ लिपिक दिलीप वाघमारे,सहाय्यक कार्यालय निरीक्षक संतोष वाणी यांनी पाहिले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/604789550200641/

Protected Content