फेसबुकवर सुसाईड नोट अपलोड तर व्हाटसअ‍ॅपवर व्हिडीओ कॉल करून आत्महत्येचा प्रयत्न

जळगाव प्रतिनिधी । नातेवाईकांमधील वादाला कंटाळून एका तरूणाने फेसबुकवर सुसाईड नोट अपलोड करून आपल्या मित्राला व्हिडीओ कॉल करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. वेळीच उपचार केल्याने या तरूणाचे प्राण वाचले आहेत.

याबाबत वृत्त असे की, सुपडू दिनकर पाटील (३५,रा.कुर्‍हाडदा, ता.जळगाव) या तरुणाने वावडदा शिवारात स्वत: च्या शेतात विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान, विष प्राशन करण्यापूर्वी त्याने मित्राला व्हिडीओकॉल केला. संबंधीत मित्राने तातडीने इतरांना माहिती दिल्याने त्याला उपचारासाठी वेळेत दाखल करण्यात आले. यामुळे त्याचे प्राण वाचले आहेत.

 सहा महिन्यांपूर्वी सुपडू याने कुर्‍हाडदा गावात मेहुण्याच्या वडीलांवर कुर्‍हाडीने हल्ला केल्याच्या आरोपातून त्याच्या विरूध्द  गुन्हा दाखल झालेला आहे. त्यानंतर त्यांच्या वाहनांचीही तोडफोड केली होती. यानंतर त्याने काल आत्महत्येचा प्रयत्न केला. सुपडू याने चिठ्ठीत वाल्मिक दौलत धनगर आणि त्याचा मुलगा तसेच अशोक रामचंद्र पाटील, अंबादास रामचंद्र पाटील, रामचंद्र शिवाजी पाटील आदींसह दोन महिलांचा उल्लेख केला आहे.

Protected Content