धरणगाव प्रतिनिधी| क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व तात्यासाहेब ज्योतिराव फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी महेंद्र (भैय्याभाऊ)महाजन यांनी खा.उन्मेष पाटील यांना निवेदनाद्वारे केली.
आज दत्तजयंती निमित्त धरणगाव शहरात विविध ठिकाणी मंगलमय कार्यक्रम सुरू आहेत. अश्याच एका पुरातन दत्तमंदिराच्या कार्यक्रमा प्रसंगी खा.उन्मेष पाटील हे आज उपस्थित होते. याप्रसंगी शहरातील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र महाजन यांनी खा.उन्मेष पाटील यांना सांगितले की, गेले कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न म्हणजे की ज्यांच्यामुळे आपण तसेच विशेष करून महिला ह्या शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आल्या. त्याफुले दाम्पत्यांना आत्तापर्यंत भारतरत्न पुरस्काराने का गौरवण्यात आले नाही? यांवर खा.उन्मेष पाटील यांनी सकारात्मक उत्तर दिले. त्यांनी हा प्रश्न संसदेत रेकॉर्डवर आलेला असून यावर लवकरात लवकर अमलबजावणी करण्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्नशील आहोत. अगामी काळात हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल.आपल्या सर्वांच्या भावना माझ्या पर्यन्त पोहोचल्या असून आपली मागणी लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करूअसे आश्वासन खा.पाटील यांनी दिले.